प्रमोद सोनवणे: प्रतिनिधी/कन्नड: तालुक्यातील उबाठा गटाला शिवसेनेच्या शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथील आनंद दिघे आश्रमात झालेल्या विशेष कार्यक्रमात या गटातील महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले.
कार्यक्रमात खासदार संदिपान भुमरे, आमदार संजना जाधव आणि जिल्हाप्रमुख भरत राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उबाठा गटातील अवचित नाना वळवळे, अशोकराव दाबके, डॉ. सदाशिव पाटील, शिवाजी थेटे आणि साईनाथ पाटील वेताळ यांसारखे महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. याशिवाय कन्नड व पिशोर भागातील अनेक कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश केला.
शिवसेना ठाकरे गटाला लागलेल्या या फटक्यामुळे उबाठा गटाची संघटना कमकुवत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कन्नड-सोयगाव मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव यांनी या प्रवेशाचे स्वागत करत कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली कन्नड तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल.
शिवसेना शिंदे गटाच्या या निर्णायक पावलामुळे कन्नड तालुक्यात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*