छत्रपती संभाजीनगर: शहर सायबर पोलीसांनी 2024 वर्षात हरवलेले व चोरीला गेलेले एकूण 1,738 मोबाईल ट्रेस केले आहेत. शहरातील बाजारतळ, शॉपिंग मॉल, भाजी मंडई, बस स्टँड, रेल्वे स्टेशन यासारख्या गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीच्या व हरवल्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पोलीस आयुक्त प्रविन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरन पांढरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक कौशल्य वापरून हे मोबाईल शोधण्याचे यश संपादन केले. जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान, चोरीला गेलेले 136 मोबाईल आणि गहाळ झालेले 1,602 मोबाईल असे एकूण 1,738 मोबाईल ट्रेस करण्यात आले.

सायबर पोलिसांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे संबंधित पोलीस ठाण्यांकडे कार्यवाहीसाठी माहिती पाठवली आहे. या मोबाईलची तक्रारदारांकडे परत सुपूर्दगी करण्याचे काम सुरू आहे.

नागरिकांना आवाहन:

सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरन पांढरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोबाईल चोरी झाल्यास अथवा गहाळ झाल्यास तात्काळ सिम कार्ड ब्लॉक करावे, पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि शासनाच्या CEIR.GOV.IN या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवावी. यामुळे मोबाईल ब्लॉक होऊन गैरवापर टळतो.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

829 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क