महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन पूर्ण होऊ लागले आहे. या योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून, २६ जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही लाभार्थी महिलांना आधीच पैसे जमा झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. उर्वरित महिलांच्या खात्यात देखील येत्या दोन दिवसांत रक्कम जमा होईल. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत आश्वासन दिले आहे.
पैसे आलेत की नाही, कसे तपासाल?
लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्यावर मेसेजद्वारे माहिती दिली जाते. मात्र, मेसेज न आल्यास बँकेच्या अॅपद्वारे किंवा बँकेत जाऊन तुमच्या खात्याची स्थिती तपासता येईल. बँकेच्या अॅपमध्ये लॉगिन करून ‘अकाउंट डिटेल्स’मध्ये शिल्लक रक्कम पाहता येईल.
लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक आधार देणारी एक महत्त्वाची योजना ठरत असून, जानेवारीचा हप्ता वेळेवर मिळाल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*