छत्रपती संभाजीनगर : नव्या घराच्या घरभरणी कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांच्या गर्दीचा गैरफायदा घेत दीरानेच वहिनीचे दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मिराज दस्तगिर पठाण (वय २०, रा. पवननगर, रांजणगाव, ता. गंगापूर) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एकूण १ लाख ६४ हजार ९०० रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

अबूजर दस्तगिर पठाण (वय २६) यांच्या घरी १७ ते २२ जूनदरम्यान घरभरणीचा कार्यक्रम होता. मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची वर्दळ असल्याने घरात नेहमीपेक्षा अधिक गडबड होती. याच गर्दीचा फायदा घेत आरोपी मिराजने घरातील १० ग्रॅम सोन्याचे नेकलेस, ३ ग्रॅमचे गंठण, २.५ ग्रॅमची अंगठी आणि १.५ ग्रॅमचे ३० मणी असे एकूण ४५ ग्रॅमचे सोनं लंपास केलं.

दागिने हरवल्याचे लक्षात येताच घरच्यांनी शोधाशोध केली, परंतु ते न सापडल्याने वाळूज एमआयडिसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान वाळूज परिसरातील एका सोनाराने मोठ्या प्रमाणात सोने घेऊन आलेल्या तरुणाबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, हेडकॉन्स्टेबल बाळू लहरे, विजय निकम यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गुन्हा उघडकीस आला असून, दागिने ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,391 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क