छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत तब्बल ५ लाख ४१ हजार ४८६ महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी दिली आहे.
प्राप्त अर्जांपैकी ४ लाख ६५ हजार ३४३ पात्र अर्ज मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. तर ११ हजार ०१९ अर्ज कायमस्वरूपी बाद करण्यात आले आहेत. त्यामध्ये १० हजार ०७५ अर्जांमध्ये त्रुटी असल्यामुळे ते बाद करण्यात आले असून, ९४४ अर्ज कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती आधी समोर आली होती. मात्र, महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, राज्य सरकारने योजनेचा पहिला हप्ता त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे महिलांना त्यांचा आर्थिक लाभ लवकरच मिळणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*