शहरातील आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम उभारले जाणार आहे. मंगळवारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेत आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत या प्रस्तावाला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे संभाजीनगरच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे. पालकमंत्री सत्तार यांनी या प्रस्तावाच्या तातडीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम उभारण्याच्या योजनांची चर्चा झाली.
सत्तार यांनी स्पष्ट केले की, खेळाडूंना उत्कृष्ट सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. प्रस्तावित फुटबॉल स्टेडियममुळे संभाजीनगरचा क्रीडा क्षेत्रातील मान उंचावेल आणि खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीची संधी मिळेल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*