छत्रपती संभाजीनगर : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे रखडलेली महापालिकेतील नोकरभरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. तब्बल २२२ पदांसाठी पुढील आठ दिवसांत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दीड वर्षांपासून प्रलंबित असलेली ही भरती प्रक्रिया आता वेग घेणार असून बेरोजगार युवकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे.

महापालिकेत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त होत असून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सध्या सुमारे दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कामकाज चालवावे लागत आहे. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे महत्त्वाची जबाबदारी देता येत नसल्याने अनेक विभागांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.

दुसरीकडे आस्थापना खर्चाच्या मर्यादा आणि शासनाच्या अटींमुळे नोकरभरती करताना प्रशासनास अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. राज्य शासन आणि विभागीय आयुक्तांकडून टप्प्याटप्प्याने भरतीस मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासनाने २२२ पदांसाठी तयारी पूर्ण केली होती. मात्र, महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब झाला.

आता आचारसंहिता संपल्यानंतर प्रशासनाने भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. या भरतीअंतर्गत विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि सेवा विभागांतील पदांचा समावेश आहे.

यामध्ये ३२ कनिष्ठ अभियंते, ४ उपअग्निशमन अधिकारी, १ सहायक सुरक्षा अधिकारी, २४ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, १२ स्वच्छता निरीक्षक, ७ पशुधन पर्यवेक्षक, १५ चालक-यंत्रचालक, ६ उद्यान सहायक, ९ अनुरेखक, १०० अग्निशमन कर्मचारी आणि १२ रोखपाल अशा एकूण २२२ पदांची भरती करण्यात येणार आहे.

ही भरती पूर्ण झाल्यास महापालिकेच्या विविध विभागांना आवश्यक मनुष्यबळ मिळणार असून प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच अनेक युवकांना शासकीय सेवेत संधी मिळणार असल्याने रोजगाराच्या दृष्टीनेही ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,935 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क