छत्रपती संभाजीनगर : शहरातून महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी यंदा विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. बारावे ज्योर्तिलिंग असलेल्या घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भक्त ये-जा करतात. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने रविवारी (दि. १५) छत्रपती संभाजीनगर ते वेरुळ मार्गावर तब्बल ५० अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या बससेवेचा मुख्य उद्देश भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या अतिरिक्त बसेस सिडको बसस्थानक, हर्मूल टी-पॉईंट, मध्यवर्ती बसस्थानक, बजाजनगर तसेच रांजणगाव या प्रमुख ठिकाणांवरून सुटणार असून सकाळपासूनच नियमित फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात दर्शनासाठी वेळेत पोहोचता येणार आहे.

याशिवाय शहरातील विविध सोसायट्या, कॉलन्या किंवा स्थानिक नागरिकांनी गटाने प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केल्यास स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किमान ३५ किंवा त्यापेक्षा अधिक प्रवासी असल्यास संबंधित भागातून थेट बससेवा सुरू करण्यात येईल. यासाठी नागरिकांनी आगाऊ माहिती देण्याचे आवाहन स्मार्ट सिटी प्रशासनाने केले आहे. या उपक्रमामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी होणारी गर्दी नियंत्रित होण्यास मदत होणार असून भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

467 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क