छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवर ओळख वाढवत फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिक महिलेला तब्बल पाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक सप्टेंबर २०२४ दरम्यान घडली असून आरोपी सचिन बाबासाहेब चांदणे (रा. निगवे खालसा, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारुशिला (वय ३८) या कृषी व्यवसाय करणाऱ्या महिला फिर्यादी आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये आरोपीने त्यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख वाढवली. विश्वास संपादन करत त्याने आपण फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून दरमहा ६० हजार रुपयांचा परतावा देतो, तसेच पुणे येथील बावधन भागात कार्यालय असल्याचे सांगितले. ४ सप्टेंबर रोजी चारुशिला या मैत्रिणींसह पुण्याला गेल्या असता आरोपीने त्यांची प्रत्यक्ष भेट घेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणुकीस प्रवृत्त केले.

सतत फोन करून दबाव टाकल्यामुळे चारुशिला यांनी टप्प्याटप्प्याने पाच लाख रुपये गुंतविले. काही काळ आरोपी त्यांच्या देवदर्शनाच्या ग्रुपमध्येही सहभागी झाला होता. मात्र नंतर किरकोळ वाद घालून संपर्क कमी केला. गुंतवणुकीनंतर एक महिना झाल्यावर परताव्याची मागणी केली असता आरोपी टाळाटाळ करू लागला.

दरम्यान, फिर्यादींच्या आई-वडिलांची प्रकृती खालावली आणि वडिलांचे निधन झाल्याने त्या काही काळ आरोपीशी संपर्क साधू शकल्या नाहीत. याच संधीचा फायदा घेत आरोपीने पैसे परत न देता फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. अखेर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण काळे तपास करत असून नागरिकांनी सोशल मीडियावरील गुंतवणूक आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

641 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क