जिल्ह्यातील नागरिकांना रेशन कार्ड हरवले असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. आता ई- रेशन कार्डच्या माध्यमातून ही समस्या सोडवता येऊ शकते. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करून नवीन ई- रेशन कार्ड मिळवता येते. हे ई- रेशन कार्ड रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी वापरता येऊ शकते.

जिल्ह्यात सध्या ५ लाख ६३ हजार रेशन कार्डधारक आहेत, ज्यामध्ये प्राधान्य कुटुंब, अंत्योदय आणि शेतकरी कुटुंब यांचा समावेश आहे. सध्या ५ हजार नागरिकांनी ई- रेशन कार्ड मिळवले आहे. नवीन नोंदणी करताना देखील नागरिकांना ई- रेशन कार्डच दिले जात आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी नमूद केले आहे की, “हरवलेले रेशन कार्ड असले तरी ई- रेशन कार्डच्या वापराच्या आधारे नागरिकांना धान्य मिळू शकते.”

यामुळे नागरिकांनी हरवलेल्या रेशन कार्डची चिंता न करता ई- रेशन कार्डच्या सुविधेचा लाभ घ्यावा.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,037 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क