गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना सार्वजनिक न्यास नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. यासाठी गणेश मंडळांचे पदाधिकारी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात गर्दी करत आहेत. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या नोंदणीत आतापर्यंत ३५३ अर्ज दाखल झाले असून, त्यातील केवळ ४३ अर्ज ऑनलाइन केले गेले आहेत, तर ३१० अर्ज ऑफलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत.
धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने परवानगी प्रक्रियेसाठी ‘एक खिडकी अभियान’ सुरू केले आहे, ज्यामध्ये अर्ज विक्री, स्विकृती, तपासणी आणि तत्काळ परवानगी देण्याची सोय आहे. मंडळे ऑफलाइन अर्जांना अधिक प्राधान्य देत असल्यामुळे, २८९ मंडळांना यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे.
गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी हे कार्यालय ७ आणि ८ सप्टेंबर रोजीही कार्यरत राहील. ज्यांना अद्याप परवानगी मिळालेली नाही, ती मंडळे ऑफलाइन अर्ज करू शकतात.
परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे:
1. मूर्ती स्थापनेसाठी जागामालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
2. पत्त्याचा पुरावा (वीज बिल आणि आधार कार्ड).
3. पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड).
4. मागील वर्षीचा हिशेब.
5. मागील वर्षीची परवानगी पत्रे.
हे सर्व कागदपत्रे सादर करून गणेश मंडळे आपली नोंदणी आणि परवानगी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*