union-budget-2025-key-announcements-tax-relief-agriculture-growth
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2025 सालाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, आरोग्य, टॅक्स स्लॅब आणि उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, 12 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना कोणताही कर लागणार नाही, अशी मोठी घोषणा करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या घोषणा:
✅ नवीन आयकर स्लॅब:
- 0 ते 12 लाख – करमुक्त
- 12 ते 16 लाख – 15%
- 16 ते 20 लाख – 20%
- 24 लाखांवरील उत्पन्न – 30%
✅ MSME क्षेत्रासाठी मोठी मदत:
- क्रेडिट गॅरंटी मर्यादा 5 कोटींवरून 10 कोटींवर वाढवली
- स्टार्टअपसाठी 10 ते 20 कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध
- लघु आणि मध्यम उद्योगांना विशेष योजना
✅ शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा बदल:
- IIT आणि वैद्यकीय शिक्षणासाठी 6500 आणि 7500 सीट वाढवणार
- 3 AI सेंटरची स्थापना
✅ रेल्वे आणि हवाई सेवा:
- 120 ठिकाणी उडान योजना लागू
- नवीन विमानतळ आणि हेलीपॅडसाठी भरीव गुंतवणूक
✅ कृषी क्षेत्रासाठी विशेष योजना:
- केंद्र सरकार डाळींच्या उत्पादनासाठी सहा वर्षांचा विशेष कार्यक्रम राबवणार
- 100 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान धनधान्य योजना लागू
✅ आरोग्य क्षेत्रात सुधारणा:
- कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवरील 36 औषधांवर सीमाशुल्क माफ
- गिग वर्कर्ससाठी सामाजिक सुरक्षा योजना
या बजेटमध्ये मध्यमवर्गीय आणि उद्योग क्षेत्राला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*