छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कर थकबाकीदारांकडून वसुली वाढवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. महापालिकेने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी प्रशासनाने थकबाकीदारांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पाच महिन्यांतच महापालिकेने ८६ कोटी १३ लाख रुपयांची वसुली केली आहे. यात ७३ कोटी ७१ लाख रुपये मालमत्ता करातून आणि १२ कोटी ४२ लाख रुपये पाणीपट्टीतून गोळा करण्यात आले आहेत. वसुलीच्या या मोहिमेत, मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या असून, त्यांना कर भरण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला आहे.
याशिवाय, नवीन मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३५ कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने थकबाकीदारांची यादी तयार करून, वसुलीसाठी विशेष योजना आखली आहे. यामुळे शहरातील कर थकबाकीदारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*