maharashtra-aadhaar-kit-distribution-4066-units
राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी नव्याने 4066 आधार किट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड. आशिष शेलार यांनी दिली आहे. 10 फेब्रुवारी रोजी या किटचे वाटप करण्यात येणार असून, आधार नोंदणी आणि नूतनीकरणाच्या प्रक्रियेत यामुळे सुलभता येणार आहे.
2014 साली जिल्हाधिकारी कार्यालयांना 3,873 आधार किट उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, यातील 1,315 किट नादुरुस्त झाल्यामुळे विविध जिल्ह्यांकडून नव्या किटची मागणी करण्यात आली होती. विशेषतः ग्रामीण भागातील वाढत्या मागणीमुळे सरकारने 2,567 नव्या किटच्या मागणीला मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर, माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड. आशिष शेलार यांनी सचिव पराग जैन नैनुटीया यांच्यासह बैठक घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि नव्याने 4066 किट वितरित करण्याचा निर्णय घेतला.
यु.आय.डी.आय (UIDAI) टेस्टिंगची प्रक्रिया सध्या सुरू असून, 10 फेब्रुवारीपासून किटचे वाटप केले जाईल. या वाटपात पुणे जिल्ह्याला सर्वाधिक 338 किट देण्यात येणार असून, भंडारधऱ्याला सर्वात कमी 23 किट मिळणार आहेत. लातूर जिल्ह्यात 271, मुंबई शहरात 103, ठाणे जिल्ह्यात 400, तर नागपूरला 91 किट वाटप करण्यात येणार आहेत.
नवीन किटमुळे आधार कार्ड संबंधित कामे जलद गतीने पूर्ण होतील. सध्या अनेक केंद्रांवर मशीन नादुरुस्त असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र, या नव्या किटमुळे आधार कार्ड नोंदणी, नूतनीकरण आणि पत्ता बदलण्याच्या प्रक्रियेत अधिक गती येईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*