छत्रपती संभाजीनगर आणि जयपूर या दोन जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांना जोडणारी विमान सेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्सकडून अहमदाबादमार्गे ही विमानसेवा उपलब्ध होणार असून, प्रवाशांना विमान बदलण्याची गरज भासणार नाही. या विमानसेवेमुळे छत्रपती संभाजीनगरहून जयपूरला केवळ ४ तासांत पोहोचणे शक्य होणार आहे.

शहरातून जयपूरसाठी विमानसेवेची मागणी गेल्या काही काळापासून सातत्याने होत होती. अखेर इंडिगोने अहमदाबादमार्गे ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी सांगितले की, या सेवेमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

 

विमानाचे वेळापत्रक:

जयपूर ते छत्रपती संभाजीनगर:

  • सकाळी 08:35 वाजता जयपूरहून उड्डाण
  • 10:15 वाजता अहमदाबादेत आगमन
  • 11:00 वाजता अहमदाबादहून छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान
  • 12:45 वाजता छत्रपती संभाजीनगरात आगमन

 

छत्रपती संभाजीनगर ते जयपूर:

  • दुपारी 01:20 वाजता उड्डाण
  • 03:05 वाजता अहमदाबादेत आगमन
  • 03:35 वाजता अहमदाबादहून जयपूरकडे प्रस्थान
  • सायंकाळी 05:10 वाजता जयपूरला आगमन

 

प्रारंभी ही सेवा अहमदाबादमार्गे असली तरी भविष्यात प्रवाशांची संख्या वाढल्यास थेट विमानसेवेची शक्यता आहे. त्यासाठी विविध संघटना प्रयत्नशील आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

839 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क