QR-code-railway-ticketing-Nanded

रेल्वे तिकिटे खरेदी करणे आता अधिक सोपे झाले आहे! नांदेड विभागात यूटीएस आणि पीआरएस काउंटरद्वारे तिकिटांची खरेदी क्यूआर कोड सुविधेमुळे अधिक सुलभ झाली आहे. सुरुवातीला काही निवडक स्थानकांवर सुरू करण्यात आलेली ही सुविधा आता विभागातील सर्व प्रमुख स्थानकांसह ७० स्थानकांवर विस्तारित करण्यात आली आहे.

नांदेड विभाग व्यवसाय सुलभ करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार कमी करण्यासाठी सर्वत्र डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे. अधिक मार्गांनी कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि बुकिंग तसेच आरक्षण काउंटरवर डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी, नांदेड विभागाने तिकीट खरेदीसाठी क्विक रिस्पॉन्स (QR) कोडद्वारे तिकीट भाडे भरण्याची अतिरिक्त सुविधा सुरू केली आहे.

या सुविधेमुळे त्वरित तिकिटे खरेदी करता येतील तसेच रोख रक्कम बाळगण्याची गरज कमी होईल. प्रवाशांना तिकीटाची अचूक रक्कम भरण्यासाठी कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही.

नांदेड विभागातील सर्व ७० स्थानकांवर तिकीट खिडकीच्या बाहेर स्वतंत्र उपकरणे बसवण्यात आली आहेत. प्रवाशाने तिकीटासाठी आवश्यक सर्व तपशील सिस्टिममध्ये भरल्यानंतर पेमेंट करण्यापूर्वी त्या उपकरणांवर क्यूआर कोड प्रदर्शित केला जातो. हा कोड प्रवासी आपल्या मोबाइलमधील पेमेंट अ‍ॅपद्वारे स्कॅन करून तिकीटाचे पैसे अदा करू शकतो. रक्कम मिळाल्याची खात्री झाल्यानंतर तिकीट तयार होऊन प्रवाशाला दिले जाते.

सुरुवातीला ही सुविधा केवळ निवडक प्रमुख स्थानकांवर लागू करण्यात आली होती, मात्र आता ती संपूर्ण नांदेड विभागात विस्तारली आहे. प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर दक्षणि मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरही ही सुविधा लागू करण्यात येणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

721 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क