एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसचा समावेश झाला असून छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावर नवीन ई-बस धावणार आहे. या बसच्या सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आनंददायी होणार आहे. ही बस पूर्णपणे एसी असून, प्रवाशांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या मार्गावर दररोज सकाळी 6 वाजता, 7 वाजता, 7:30 वाजता, 8 वाजता, 8:30 वाजता आणि 11:30 वाजता बस उपलब्ध असेल. महामंडळाच्या सर्व सवलती या ई-बसमध्ये देखील लागू असणार आहेत. 75 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना अर्ध टिकीट यासारख्या सवलती या सेवेत लागू करण्यात आल्या आहेत.
या सुविधेबद्दल प्रवाशांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासासाठी ही ई-बस एक चांगला पर्याय ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
एसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतुकीत नवीन युगाचा प्रारंभ होत आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*