मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला कठोर इशारा दिला आहे. जालन्यात सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या पथकाने आज सकाळी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. यावेळी त्यांची शुगर कमी झाली असून, रक्तदाब आणि ऑक्सिजन पातळी नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रकृती खालावत असतानाही जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले, “एक वर्ष झाले आम्ही सरकारला सहकार्य करत आहोत. आता मात्र तातडीने निर्णय घेतला पाहिजे. जर मागण्या दोन दिवसांत पूर्ण केल्या नाहीत तर सरकारला अवघड दिवस येतील.” यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली असून, मराठा समाजाच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली आहे.
जरांगे पाटील यांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आहे. राज्य सरकारने दोन दिवसांत मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*