शेंद्रा एमआयडीसीत बुधवारी (दि. १८) ज्युपिटर तात्रावॅगोंका रेलव्हील कंपनीचे उद्घाटन करण्यात आले. या कंपनीत रेल्वेच्या चाकांचे उत्पादन केले जाणार असून, यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे २०० लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमात बोलताना ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विवेक लोहिया यांनी सांगितले की, पश्चिम बंगालस्थित ज्युपिटर वॅगन्सने बोनाट्रान्स इंडिया कंपनीला २७१ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. ज्युपिटर वॅगन्सने तात्रावॅगोंका ए. एस. यांच्यासोबत भागीदारीत ही नवी कंपनी स्थापन केली आहे.
प्रारंभीच्या टप्प्यात, ज्युपिटर तात्रावॅगोंका रेलव्हील दर महिन्याला १ हजार रेल्वे व्हीलसेट्स तयार करणार आहे. पुढील दोन वर्षांत या उत्पादन क्षमतेत वाढ करून हे प्रमाण ५ हजार व्हीलसेट्सपर्यंत नेले जाणार आहे. ही रेल्वे चाके भारतीय रेल्वेबरोबरच युरोप आणि इतर देशांमध्ये निर्यात करण्याचेही नियोजन आहे. “बोनाट्रान्सचे अधिग्रहण झाल्यानंतर आम्ही रेल्वेच्या विविध सुट्या भागांच्या पुरवठ्यासाठी एकात्मिक साखळी निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत,” असे लोहिया यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*