महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) मुख्य प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. या कारवाईत २० अनधिकृत दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहेत. ही दुकाने अपंग व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांसाठी दिली गेली होती, परंतु त्यांनी अनधिकृत पद्धतीने पोटभाडेकरू ठेवले होते, ज्यामुळे या अतिक्रमणाची कारवाई करण्याची वेळ आली.
या २० दुकानांपैकी ७ दुकाने नगर परिषदेच्या काळात वाटप करण्यात आली होती. २०२२ पासून महानगरपालिकेने या दुकानदारांना परवाना नूतनीकरण देणे थांबवले होते. याशिवाय, या दुकानांसमोर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, ज्यामुळे रुग्णालय प्रशासनाने यावर कडक कारवाईची मागणी केली होती.
अतिक्रमणविरोधी कारवाईत ८ मेडिकल स्टोअर्स आणि १२ इतर व्यवसाय, जसे की खानावळ आणि चहा-नाश्त्याची केंद्रे, हटविण्यात आली. या मोहिमेत अतिक्रमण विभाग, यांत्रिकी विभाग, तसेच विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*