केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा सकारात्मक झाली. सुरुवाती पासूनच चर्चा सकारात्मक सुरू आहे. लवकरच निर्णय होईल, जे होईल ते समन्वयाने होईल. तसा लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. चिकलठाणा विमानतळावर मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तत्पूर्वी मंगळवारी रात्री शहरातील रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यात तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा झाली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*