केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.
‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्यात दिनेश परदेशी यांनी शिवसेनेची मशाल हाती घेतली, आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
दिनेश परदेशी यांच्या या पक्ष प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे, तसेच शिवसेनेला जिल्ह्यात अधिक बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*