जायकवाडी धरणातील पाणीपातळी सध्या ९९.३९ टक्क्यांवर पोहोचली आहे. बुधवारी रात्री धरणक्षेत्रात आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढलेल्या आवकेमुळे एक दिवस आधी उघडलेले धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे आता तीन फुट उंच उघडून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या गोदावरी नदीच्या पात्रात ५७,०९२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आवक वाढत असल्याने आपत्कालीन दरवाजे उघडण्याची शक्यता अधिक आहे.
बुधवार रात्रीपासून जायकवाडी धरणात ४४,७५२ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. या वाढत्या आवकेचा विचार करून पाटबंधारे विभागाने धरणाचे दरवाजे एक फुटावरून तीन फूट उंच उघडले आहेत. धरणाजवळील दगडी पुलावरून पाणी वाहत आहे, तसेच नाथ मंदिर परिसरातील दशक्रिया घाटाच्या पायऱ्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत. पुढील काळात आवक अधिक वाढल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी जायकवाडी धरणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेटिंग केली आहे. धरणावर विसर्ग पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना थांबवून, धरणाच्या परिसरात चालत जाण्याची परवानगी दिली जात आहे.
धरणाची परिस्थिती लक्षात घेता, संबंधित अधिकारी आणि प्रशासन सर्वतोपरी सतर्क राहून आवश्यकतेनुसार पुढील पावले उचलत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*