शहरातील प्रसिद्ध कर्णपूरा देवीच्या यात्रेची सुरुवात गुरुवार, दि. ३ ऑक्टोबरपासून होणार आहे. या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज देवी मंदिर व यात्रोत्सव स्थळाची पाहणी केली. भाविकांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.
पाहणी दरम्यान तहसीलदार नितीन गर्जे, कार्यकारी अभियंता उमेश वाघमारे, पोलीस उपायुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, संतोष बन्सीले, अनिता पुंडे, मंदिर ट्रस्टी आणि मनपा व जिल्हा प्रशासनाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी यात्रोत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यांनी नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून या धार्मिक उत्सवाचा सर्वांना योग्य लाभ घेता येईल.
यात्रा उत्सवासाठी स्वच्छता, भाविकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्त्याची सोय, गर्दीचे नियोजन, पोलीस प्रशासनाची तयारी, महावीर चौकातील उड्डाणपूलाखाली रहदारी नियंत्रण, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिसराचे निरीक्षण, नियंत्रण कक्षाची स्थापना, अग्निशमन दल, आरोग्य पथक, रुग्णवाहिका, आणि फिरत्या शौचालयांची व्यवस्था यांचीही पाहणी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस वापर, खाद्यपदार्थांच्या नमुना चाचण्या, प्लास्टिक पिशवी बंदी, तसेच आकाश पाळणा व मौत का कुआं यांसारख्या राईड्सच्या स्ट्रक्चरची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*