राज्यात शुक्रवारपासून (13 डिसेंबर) तीव्र थंडीची लाट जाणवणार असून, ती 18 डिसेंबरपर्यंत कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात गुरुवारपासूनच थंडीची लाट जाणवू लागली असून, विदर्भातील पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे.
पश्चिमी चक्रवाताचा परिणाम
पाकिस्तानातून आलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील काश्मीरपासून मध्य प्रदेशापर्यंतचा भाग थंडीने गारठला आहे. राजस्थानातील सिकर येथे गुरुवारी हंगामातील सर्वात कमी 1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्या भागातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून, विदर्भापासून राज्यातील अनेक भागांत थंडीची तीव्रता वाढली आहे.
गुरुवारी नोंदवलेले किमान तापमान (सेल्सिअस)
- नागपूर: 9.8
- गोंदिया: 9.8
- वर्धा: 10.5
- नाशिक: 11.7
- अकोला: 12.5
- अमरावती: 11.4
- बुलडाणा: 13
- छत्रपती संभाजीनगर: 12
- परभणी: 11.5
- बीड: 11.9
- पुणे: 13.3
- जळगाव: 10.3
- मुंबई: 21.6
- कोल्हापूर: 18.2
- सांगली: 17.2
- सातारा: 15.5
थंडीपासून संरक्षणासाठी उपाययोजना
राज्यातील नागरिकांनी या थंडीच्या लाटेत स्वतःचे संरक्षण करावे. उबदार कपडे वापरावेत, गरम पदार्थांचे सेवन करावे, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*