छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागाच्या अंतर्गत असलेल्या शस्त्रगृहात शनिवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या पॅनलमध्ये बिघाड होऊन ही आग लागली. मात्र, कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन फायर एक्स्टिंग्विशरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीही रुग्णालयातील यंत्रणेची नियमित तपासणी आणि देखभाल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*