छत्रपती संभाजीनगर: क्रांतीचौक पोलिसांच्या डी.बी. (Detection Branch) पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणात मोठी कामगिरी बजावत दोन चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून 14 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. हस्तगत केलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 8 लाख 5 हजार रुपये आहे.
आज दुपारी तक्रारदार अर्जुन गवळी यांच्या हिरो HF डिलक्स मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी डी.बी. पथकाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करून आरोपी तैजिव मुजीव शेख (वय 24, रा. समर्थनगर, गंगापुर) आणि सलिम अयुब पठाण (वय 25, रा. समर्थनगर, गंगापुर) यांना अटक केली.
अटक आरोपींकडून हिरो HF डिलक्स, हिरो स्प्लेंडर प्रो, हिरो पेंशन प्रो, पल्सर, शाईन होंडा, डेस्टीनी स्कूटी यांसारख्या 14 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपआयुक्त नितीन वगाटे आणि प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकप्रमुख अशोक इंगोले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास पथकात संतोष मुदीराज, अर्शद शेख, माजीद पटेल, ईरफान खान, भाऊसिंग चव्हाण यांचा समावेश होता.
पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*