छत्रपती संभाजीनगर: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष आंदोलनाला छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. संविधान बचाओ देश बचाओच्या वतीने आज शहरातील क्रांती चौक येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
गेल्या निवडणुकांमध्ये पैशांचा महापूर वाहिला असल्याच्या निषेधार्थ मागील महिन्यात बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून, आज छत्रपती संभाजीनगरमधील कार्यकर्त्यांनीदेखील त्यांच्या आंदोलनाच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या उद्देशाने आयोजित या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भ्रष्टाचार, निवडणुकीतील पैशाचा वापर, आणि लोकशाही मूल्यांवर होणाऱ्या आघातांवर आवाज उठवला.
या धरणे आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “संविधान वाचवा, देश वाचवा” अशा घोषणा देत जनतेला या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. आंदोलन शांततामय पद्धतीने पार पडले आणि शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी संविधानिक मूल्यांसाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*