छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त मंगळवारी (14 जानेवारी) सकाळी 6 ते रात्री 12 वाजेदरम्यान मिलिंद चौक ते मकाई गेट हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार असल्याची माहिती छावणी वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली आहे.
विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी विद्यापीठ गेट येथे राज्यभरातून दोन ते अडीच लाख नागरिक येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी विविध संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने व्याख्याने, प्रबोधनपर कार्यक्रम आणि भीमगीतांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग:
1. नगर नाका, भावसिंगपुरा, मिलिंद चौकमार्गे बेगमपुरा, विद्यापीठ, पाणचक्की, बीबी का मकबराकडे जाणारी वाहने
→ मिलिंद चौक, बारापुल्ला गेट, मिल कॉर्नरमार्गे मार्गस्थ होतील.
2. बेगमपुरा, बीबी का मकबराकडून विद्यापीठ गेट, मिलिंद चौक मार्गे नगर नाका व छावणीकडे जाणारी वाहने
→ मकाई गेट, टाऊन हॉल, भडकल गेट, मिल कॉर्नर, बाबा पेट्रोल पंपमार्गे मार्गस्थ होतील.
वाहतूक शाखेने नागरिकांनी नियोजित मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. गर्दी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*