छत्रपती संभाजीनगर :  शहरात गुरुवारी (दि. १२ जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मृगधारांचा पाऊस झाला. दिवसभराच्या उकाड्यानंतर आलेल्या या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जोरदार वाऱ्यांमुळे शहरात धुळीचे लोट उठले आणि अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

हवामान वेधशाळांच्या नोंदीनुसार, एमजीएम विद्यापीठात २.८ मिमी, तर गांधेली येथे ८.७ मिमी पावसाची नोंद झाली. एमजीएम विद्यापीठात वाऱ्याचा वेग ४५.६ किमी/तास, गांधेली येथे ५७.२२ किमी/तास आणि पडेगाव स्कूल परिसरात ४०.७ किमी/तास इतका नोंदवण्यात आला. या वादळी वाऱ्यांमुळे शहरातील ११ ठिकाणी झाडे कोसळली. ज्युबिली पार्क, आंबेडकर चौक, उल्कानगरी, देवगिरी कॉलनी अशा विविध भागांत झाडांच्या कोसळण्याच्या घटना घडल्या. रोपळेकर हॉस्पिटलजवळ पाणी साचल्याने अग्निशमन दलाने तत्काळ पंपिंग करून तो परिसर रिकामा केला.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपत्कालीन मान्सून कंट्रोल रूम सुरू केली आहे. नागरिकांना अडचण आल्यास 0240-2617165 किंवा 2617166 या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनपासून अधिकृत मान्सून सुरू होण्याची शक्यता असून, पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढेल. आतापर्यंत (१ ते १२ जून) २०.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, अपेक्षित ५०.१ मिमीच्या तुलनेत ही मात्रा कमी आहे. मात्र वातावरण आता पावसासाठी पूरक होत चालले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,247 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क