छत्रपती संभाजीनगर: शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या तरुणाच्या ताब्यातून 31,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव प्रतीक सचिन पाटणी (वय 22) असे आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला आज अटक केली असून, जवाहर नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायलॉन मांजामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान तसेच नागरिकांच्या जीवाला धोका लक्षात घेता अशा प्रकारच्या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, काहीजण बेकायदेशीररीत्या या मांजाची विक्री करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास जवाहर नगर पोलीस करत आहेत. नागरिकांनीही अशा बेकायदेशीर विक्रीविरोधात सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*