छत्रपती संभाजीनगर: शहरातील पुंडलिक नगर पोलीस स्टेशन हद्दीत एका 50 वर्षीय गृहिणीची फसवणूक करत तिच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना घडली आहे. नंदाबाई अन्नासाहेब काळे (वय 50, रा. देवळाई परिसर) यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे.
घटनेचा तपशील असा की, दि. 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास नंदाबाई काळे या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाजवळ रिलायन्स मॉलच्या मागील रस्त्याने जात होत्या. यावेळी एका अनोळखी इसमाने त्यांना आवाज देत समोर मर्डर झाल्याचे सांगून स्वतःला पोलीस अधिकारी (पीएसआय) असल्याचे भासवले. तसेच त्याने सोन्याचे दागिने काढून देण्याचा आग्रह केला.
नंदाबाई यांनी दागिने काढून देण्यास नकार दिल्यानंतर, त्याच्या साथीदाराने जबरदस्ती करत त्यांच्या हातातील २ लाख रुपये किमतींच्या पाच तोळ्यांच्या दोन सोन्याच्या बांगड्या हिसकावून पळ काढला.
या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात नंदाबाई यांनी पुन्हा दाखल केला असून , तपासिक अधिकारी सपोनि कन्हाळे हे प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
शहरात अशा प्रकारच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*