छत्रपती संभाजीनगर: देवगिरी महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९, रा. माजलगाव) याच्या हत्येचे गूढ उकलले असून, त्याचा खून त्याच्याच रूम पार्टनरने केल्याचे समोर आले आहे. आरोपी विधी संघर्ष बालक असल्याने पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याला बाल कल्याण समितीकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आर्थिक वाद ठरला कारण
प्रदीप आणि विधी संघर्ष बालक हे नात्याने मावस भाऊ होते. विधी संघर्ष बालक हा प्रदीपच्या मोबाईलवर नेहमी ऑनलाईन गेम खेळत असे. या गेममध्ये त्याने १ लाख रुपये जिंकले होते. मात्र, प्रदीपने त्याच्या अकाउंटमधील १ लाखापैकी ६५ हजार रुपये गमावले. यावरून दोघांमध्ये वाद झाले आणि रागाच्या भरात विधी संघर्ष बालकाने प्रदीपचा निर्घृण खून केला.
हत्या कशी उघड झाली?
प्रदीप शहरातील उस्मानपुऱ्यातील भाजीवालीबाई पुतळ्याजवळील अपार्टमेंटमध्ये तीन मित्र आणि मावस भावासोबत राहत होता. प्रदीपचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी सात पथकांची स्थापना करून तपास सुरू केला. त्यांनी रूममधील सर्व मित्रांची चौकशी केली. संशय वाढल्यावर विधी संघर्ष बालकाला विश्वासात घेतले असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांच्या वेगवान तपासाचे कौतुक
उस्मानपुरा पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला पकडले. या वेगवान तपासामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
आर्थिक वादातून घडलेली ही दुर्दैवी घटना समाजाला सावधानतेचा संदेश देत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*