छत्रपती संभाजीनगर : शहरातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ‘पिंक ई-रिक्षा’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी मिळणार असून, प्रवासी महिलांसाठी सुरक्षित वाहतुकीचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.

ऑक्टोबर २०२४ पासून यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यामध्ये एकूण ६१५ महिलांचे अर्ज प्राप्त झाले. त्यातील कर्जप्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ३५ महिलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, त्या जुलै महिन्यापासून रिक्षा चालवण्यासाठी सज्ज असतील.

सध्या ६० महिला प्रशिक्षण प्रक्रियेत असून, येत्या काही महिन्यांत त्यांच्या प्रशिक्षणासही पूर्णत्व येईल. अशा प्रकारे लवकरच १०० हून अधिक महिला रिक्षाचालक शहरात सेवा देऊ लागतील. यामुळे महिलांची आर्थिक उन्नती तर होईलच, शिवाय प्रवासात महिलांना सुरक्षितता जाणवेल.

महिलांना केवळ वाहन चालवण्याचे प्रशिक्षणच नाही, तर आर्थिक साक्षरता, ग्राहक सेवा, वाहतूक नियम अशा अनेक बाबींचे प्रशिक्षणही दिले जात आहे. हे संपूर्ण प्रशिक्षण महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली कायनेटिक कंपनीमार्फत दिले जात आहे.

योजनेनुसार, रिक्षेच्या एकूण किंमतीपैकी २०% अनुदान शासन देणार आहे, १०% रक्कम लाभार्थी महिलांनी भरायची, तर उर्वरित ७०% अत्यल्प व्याजदरावर कर्जरूपाने उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात भव्य कार्यक्रमात रिक्षा वाटप करण्यात येणार असून, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही निमंत्रित करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,190 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क