छत्रपती संभाजीनगर: “भारतीयांना आपल्या देशात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र बाहेरच्या, विशेषतः बांगलादेशी नागरिकांना येथे राहण्याचा अधिकार नाही,” असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
मुंबईतील सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत पवार म्हणाले की, “त्या हल्ल्यातील आरोपी बांगलादेशी होता, ज्याने काही दिवस हाऊसकिपिंगचे काम केले होते. पोलिसांनी त्याची चौकशी करून ही माहिती उघड केली.” त्यांनी बाहेरच्या नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोसायट्यांनीही सतर्क राहण्याचे आवाहन केले.
पालकमंत्री नियुक्तीच्या विषयावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “पालकमंत्री नेमण्याचा निर्णय पूर्णतः मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत. ते परत आल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत नियुक्त पालकमंत्रीच झेंडावंदन करतील.”
पवार यांनी संविधान आणि कायद्याचे पालन करण्यावर जोर दिला. “भारतीय नागरिकांनी त्यांच्या अधिकारांमध्ये राहून वागले पाहिजे, तर बाहेरच्या नागरिकांना देशात बेकायदेशीररित्या राहू देणे अयोग्य आहे,” असे ते म्हणाले.
देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत, असे आवाहन करत त्यांनी भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे संदेश दिले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*