छत्रपती संभाजीनगरमधील सादातनगर भागात ऐंजल १ ब्रोकिंग कंपनीच्या नावाने दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवत चुलत भावासह २४ तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २२ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा सातारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अमोल संजय जाधव (वय २४, रा. सादातनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचा चुलत भाऊ ऋषिकेश मिलिंद जाधव आणि त्याची पत्नी पूजा अयोक सुखधान यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये अमोलच्या घरी येऊन गुंतवणुकीचे आमिष दाखवले. पूजाने सांगितले की ती ऐंजल १ ब्रोकिंग कंपनीत काम करते आणि या कंपनीत गुंतवणूक केल्यास दोन महिन्यांत दुप्पट परतावा मिळतो.
या आमिषाला बळी पडून १४ जून २०२३ रोजी अमोल आणि इतर नातेवाईकांनी २२ लाख रुपये रोख आणि काही रक्कम पूजाच्या तसेच इतर आरोपींच्या बँक खात्यावर वर्ग केली. ५ जुलै २०२४ रोजी पूजाने इशान स्टॉक मार्केटच्या नावाने करारनामा तयार करून गुंतवणुकीची हमी दिली होती. मात्र, गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर पैसे परत मिळवण्यासाठी अमोलने पाठपुरावा केला असता आरोपींनी टाळाटाळ केली.
तक्रारीनुसार, या प्रकरणात ऋषिकेश जाधव, पूजा सुखधान, छाया अशोक सुखधान आणि राहुल सुखधान यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सातारा पोलीस करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*