श्रावणाचा महिना सुरू होताच सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरु झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्तेही मोठ्या उत्साहात आपल्या बाप्पांच्या स्वागताची तयारी करत आहेत. यंदा त्यांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ची घोषणा केली आहे. यातील विजेत्या मंडळाला ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

कोणते गणेश मंडळ सहभागी होऊ शकते?

या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. स्पर्धा नि:शुल्क आहे.

 स्पर्धेचे निकष काय असणार?

स्पर्धेसाठी खालील निकषांवर गणेश मंडळांचे परीक्षण केले जाईल:

1. सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन.

2. संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी राबविलेले उपक्रम.

3. गडकिल्ले आणि स्मारकांचे जतन व संवर्धन.

4. धार्मिक स्थळांविषयी जनजागृती व संवर्धन.

5. विविध सामाजिक उपक्रम.

6. पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट.

7. ध्वनिप्रदूषणरहित वातावरण.

 

पुरस्कार व वितरण

राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम विजेत्या सार्वजनिक गणेश मंडळाला ५ लाख रुपये, द्वितीय विजेत्याला २.५ लाख रुपये, आणि तृतीय विजेत्याला १ लाख रुपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाईल. जिल्हास्तरावर प्रथम विजेत्याला २५ हजार रुपये व प्रमाणपत्र मिळणार आहे.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख आहे. अर्ज ई-मेलद्वारे mahotsav.plda@gmail.com वर पाठवावा.

कोण करणार परीक्षण?

गणेशोत्सवाच्या सुरुवातीस ७ सप्टेंबरपासून स्पर्धेत सहभागी गणेश मंडळांच्या परीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय समिती गठित केली जाईल, जी मंडळांना भेट देऊन त्यांच्या कार्याचे परीक्षण करेल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

306 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क