राज्यातील शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असतानाही जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील २ लाख १० हजार ३०७ विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव विद्यार्थ्यांना विना गणवेश साजरा करावा लागणार आहे.
राज्य शासनाने ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी एक गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत शिलाईसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, नियोजित वेळेत हे काम पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळू शकलेला नाही. गणवेशासोबतच बूट आणि पायमोजेही दिले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे, परंतु अद्याप काहीही वितरण झालेले नाही.
३० ऑगस्टपर्यंत गणवेशांचे शिलाईचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर आलेला स्वातंत्र्य दिन हा विद्यार्थ्यांना विना गणवेशाचाच साजरा करावा लागणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे, तर विद्यार्थ्यांमध्येही गणवेश मिळण्याची प्रतिक्षा सुरूच आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*