गरजू महिलांसाठी रोजगाराची संधी: गुलाबी ई-रिक्षा योजना सुरूगरजू महिलांसाठी रोजगाराची संधी: गुलाबी ई-रिक्षा योजना सुरू

जिल्हा महिला व बालविकास विभागाने महिलांना रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गरजू महिलांना सुरक्षित प्रवासासाठी गुलाबी (पिंक) ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.एम. वने यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या योजनेअंतर्गत ८ जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे. पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना विशेषत: गरजू महिलांसाठी आहे, ज्यात विधवा, कायद्याने घटस्फोटीत, अनाथ, अनुरक्षण गृहातील युवती तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

पात्रता व अटी

लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाव्यात, त्यांचे वय १८ ते ३५ दरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. वाहन चालक परवाना आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. निवड प्रक्रियेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करणार आहे.

ई-रिक्षाच्या किमतीच्या १०% रक्कम लाभार्थींनी भरायची आहे, २०% राज्य सरकार देईल, तर उर्वरित ७०% बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात दिले जाईल. या कर्जाची परतफेड ५ वर्षांच्या आत करावी लागेल. तसेच, या योजनेअंतर्गत फक्त एकदाच लाभ मिळू शकतो.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

– आधार कार्ड

– पॅन कार्ड

– अधिवास प्रमाणपत्र

– उत्पन्नाचा दाखला

– बँक खाते पासबुक

– पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

– मतदार ओळखपत्र

– रेशनकार्ड

– चालक परवाना

– रिक्षा चालविण्याचे हमी पत्र

 

महिला व बालविकास विभागाने महिलांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. हे पाऊल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,471 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क