मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विकासाच्या मार्गावर मोठी झेप घेतली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणार आहेत. शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, नागरी विकास, शेती आणि रस्त्यांच्या प्रकल्पांमध्ये अमूल्य सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने ही बैठक ऐतिहासिक ठरली आहे.
नगरविकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, नगराध्यक्षांचा कार्यकाळ आता अडीच वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढविण्यात आला आहे. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थिरतेसाठी मोलाचा ठरणार आहे. तसेच, रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी 37,000 कोटींच्या भरीव निधीसह राज्यभरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आलेल्या प्रमुख निर्णयांचे ठळक मुद्दे:
1. दुग्ध विकासाला गती : विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्ध व्यवसायासाठी 149 कोटींची मंजुरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा.
2. देवस्थान जमिनींचे वर्गीकरण: मराठवाड्यातील देवस्थान आणि इनाम जमिनींचे वर्गीकरण करून लाखो नागरिकांना हक्काचे लाभ मिळणार.
3. वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना: राज्यातील डेक्कन कॉलेज, गोखले संस्था आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू.
4. वीजदर सवलत: यंत्रमागधारकांना वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च 2025 पर्यंत शिथिल.
5. वैद्यकीय महाविद्यालयातील मानधन: सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांसाठी ठोक मानधन योजना लागू.
6. रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण: 6,000 किमी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी 37,000 कोटींचा मंजुरी निर्णय.
7. नगराध्यक्षांचा कार्यकाळ: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगराध्यक्षांचा कार्यकाळ आता पाच वर्षांचा करण्यात आला आहे.
8. सौर ऊर्जा प्रकल्पांना गती: सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी स्थिर व्याजदराने कर्ज मंजुरीचा महत्त्वपूर्ण निर्णय.
राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयांनी राज्यातील जनतेच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मार्गावर ही मोठी झेप ठरेल. हे निर्णय केवळ विकासाची गती वाढवणार नाहीत, तर सामान्य माणसाच्या जीवनातही गुणात्मक सुधारणा घडवून आणतील.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*