मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने रविवारी महाराष्ट्रभर “जोडो मारो” आंदोलन केले. मविआच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर देत भाजपने देखील राज्यभरात आंदोलनाची हाक दिली.
मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडीने पायी मोर्चा काढून गेटवे ऑफ इंडिया येथे शिवपुतळा स्थानी “जोडो मारो” आंदोलन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात ठाकरेंवर पलटवार केला. फडणवीस यांनी काँग्रेसवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा आरोप करत, “जवाहरलाल नेहरुंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले आहे, त्यासाठी काँग्रेसने माफी मागावी का?” असा सवाल ठाकरेंना केला.
याशिवाय, फडणवीस यांनी मध्यप्रदेश आणि कर्नाटकमधील काँग्रेसने केलेल्या कथित घटनांचा उल्लेख करून ठाकरेंना आणि शरद पवारांना सवाल केला, “मध्यप्रदेशमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवला गेला, तर कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवरायांचा पुतळा हटवला. या घटनांवर ठाकरे आणि पवार गप्प का आहेत?”
भाजपच्या या प्रतिक्रियेने राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे, आणि आगामी काळात या विषयावरून राजकारणात आणखी घमासान होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*