छत्तीसगडचे काही आमदार काल रात्री अचानक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या आमदारांनी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये मुक्काम केला आहे. हॉटेलबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

या घडामोडींमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, यामुळे गुवाहटी ऑपरेशनची आठवण होते. त्या वेळीही काही आमदार एका हॉटेलमध्ये गोपनीयरीत्या दाखल झाले होते, ज्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये चालू असलेल्या या हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,442 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क