छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी ही घोषणा करताना मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साबळे यांच्या माघारीमुळे मराठा समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
साबळे यांनी सांगितले की, “गेल्या चार वर्षांपासून मी मतदारसंघात कार्यरत आहे. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने लढा देत आहे. निवडून आल्यास आरक्षणाचा लढा बळकट करीन, असे बाँड देण्यासही तयार आहे.” मात्र, मनोज जरांगे यांनी उमेदवारांना बाँड देण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केल्याचे सांगत, समाजाच्या विरोधात जाणार नसल्याचे स्पष्ट करून साबळे यांनी माघार घेतली आहे.
साबळे हे मराठा आरक्षणाच्या लढ्यातून ओळखले जातात. त्यांनी जालना लोकसभा निवडणुकीत दीड लाख मते मिळवली होती, ज्यात फुलंब्रीतून त्यांना ३० हजार मते मिळाली होती.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*