पैठण तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घडामोड आज समोर आली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा गटाचे विधानसभेचे उमेदवार आणि पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय पाटील गोर्डे यांनी आज दुपारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश चिकलठाणा येथील भाजप कार्यालयात पार पडला.

भाजपचे प्रदेश नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गोर्डे यांचा पक्षप्रवेश झाला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दत्तात्रय गोर्डे यांनी यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि पैठण शहरात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.

गोर्डे यांच्या भाजप प्रवेशामुळे पैठण तालुक्यात भाजपाला मोठे बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच उबाठा गटासाठी ही मोठी नामुष्की मानली जात असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर या पक्षप्रवेशाचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे पैठणच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याचे संकेत मिळत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,926 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क