छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी १६ एप्रिलपर्यंत प्रत्येक तहसीलदारांना आपापल्या तालुक्यातील सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या ग्रामविकास विभागाने ११ मार्च २०२५ रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तहसीलदारांनी ग्रामपंचायतीच्या सदस्यांसमोरच आरक्षण सोडत पार पाडावी, तसेच सर्व प्रवर्गांना संधी मिळण्यासाठी प्रक्रिया आळीपाळीने राबवावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

४८० सरपंचपदे खुल्या प्रवर्गासाठी

या प्रक्रियेत ४८० सरपंचपदे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहेत, तर २३५ पदे ओबीसी प्रवर्गासाठी, अनुसूचित जातीसाठी १०८ आणि अनुसूचित जमातीसाठी ४७ पदे आरक्षित आहेत. यामध्ये महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून, अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी ५५, अनुसूचित जमाती महिलांसाठी २७, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ११९ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २४२ पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ११५, पैठण ११०, फुलंब्री ७१, वैजापूर १३५, गंगापूर १११, कन्नड १३८, खुलताबाद ४०, सिल्लोड १०४ आणि सोयगाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायती आहेत.

सरपंचपदाच्या आरक्षण प्रक्रियेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामाजिक समतोल साधण्यास मदत होईल. तसेच, विविध प्रवर्गातील नागरिकांना प्रतिनिधित्वाची संधी मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

608 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क