पडेगाव परिसरातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी ३३ केव्ही पडेगाव उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. या कामासाठी उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व ११ केव्ही वाहिन्यांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा उद्या, ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
यामुळे पडेगाव परिसरासह मीरानगर, बॉम्बे मार्केट, रामगोपालनगर, पोलिस कॉलनी, तारांगण, देवगिरी कॉलनी, निसर्ग कॉलनी, पेठेनगर, दर्गा, मिटमिटा व इतर भागातील वीजपुरवठा प्रभावित होईल. या काळात चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्याचा महावितरण प्रयत्न करणार असून, ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*