खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील दुधारे वस्तीवर गुरुवारी (दि. ५) रोजी सकाळी सहा वाजता मायलेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत वंदना भरत दुधारे (३५) आणि त्यांची मुलगी पल्लवी भरत दुधारे (१८) या दोघींचा मृत्यू झाला आहे.

शेतकरी भरत भिकन दुधारे यांची शेती गल्लेबोरगाव आखातवाडा रोडवरील दुधारे वस्तीवर आहे. तेथेच शेतवस्तीवर दुधारे कुटुंबासह राहत होते. बुधवारी रात्री उशिरा वंदना आणि पल्लवी यांनी विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी सकाळी वंदना यांचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर ग्रामस्थांनी शोध घेतला असता, मुलगी पल्लवीचा मृतदेह विहिरीच्या तळाशी सापडला.

दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेरूळ येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. मायलेकींच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,906 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क