गणेशोत्सवाच्या काळात अवैध धंद्यांवर पोलिसांची नजर कमी असेल, या गैरसमजातून काहीजण हे काळे धंदे अधिकच जोमात करत असतात. असाच एक प्रकार सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग चौकात उघडकीस आला आहे. मेराज समद तांबोळी (वय ३०, रा. रहेमानिया कॉलनी) नावाचा व्यक्ती आपल्या दुचाकीवरून राजनिवास, रजनिगंधा आणि हिरा गुटखा खुलेआम विक्री करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
सिडको पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी छापा मारला. या कारवाईत मेराजकडून ६५ हजार रुपयांचा गुटखा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी तांबोळीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले, जिथे त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गुटखा विक्रीवर राज्यात बंदी असूनही, काही वितरक आणि विक्रेते लपूनछपून आपले अवैध धंदे चालवत आहेत. सिडको पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आणखी किती मोठ्या पुरवठादारांचा पर्दाफाश होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते करत आहेत.
सिडको पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*