छ्त्रपती संभाजीनगर येथे उल्कानगरीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात एका ७३ वर्षीय वृद्धाची फसवणूक करत दोन भामट्यांनी त्याच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या चोरल्या. ही घटना ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सतीश हरिनारायण मालपाणी, हे सेवानिवृत्त कर्मचारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गेले असताना, दोन भामट्यांनी त्यांना पोलिस असल्याचे भासवले. बनावट पोलिस ओळखपत्र दाखवून, त्या भागात चोऱ्या वाढल्याचा खोटा दावा करत, त्यांनी मालपाणी यांना विश्वासात घेऊन त्यांच्या बोटातील एक ४ ग्रॅमची आणि दुसरी ३ ग्रॅमची अंगठी काढायला लावली. भामट्यांनी हातचलाखीने या अंगठ्या चोरल्या आणि तिथून पसार झाले. या प्रकरणाचा तपास हवालदार दिनकर नरोटे करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

440 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क