मराठा समाजाला आरक्षण आणि इतर विकासाच्या मागण्यांसाठी १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले.
दीपक केसरकर यांच्या हस्ते सरबत पिऊन उंबरे यांनी उपोषण समाप्त केल्याची घोषणा केली. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांचे उपोषण सुरू होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत सायंकाळी झालेल्या बैठकीत, केसरकर यांनी त्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा केली आणि सरकारच्या सकारात्मक भूमिकेबाबत माहिती दिली.
याआधी, सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर कायदेशीर चौकशी करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते.
शासनाच्या भूमिकेबाबत स्पष्टता मिळाल्यानंतर उंबरे यांनी माध्यमांसमोर आपले उपोषण स्थगित केल्याचे सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*